2004 मध्ये आलेल्या मर्डर चित्रपटात इम्रान हाशमी आणि मल्लिका शेरावत यांची रोमॅंटिक केमिस्ट्री सर्वांनीच पहिली.
या चित्रपटामुळे प्रेक्षकांमध्ये ही जोडी सुपरहिट ठरली होती.
परंतु याच चित्रपटा दरम्यान दोघांमध्ये वाद सुरू झाला होता.
तब्बल 20 वर्षा नंतर सगळं विसरून इम्रान आणि मल्लिका एकत्र आले.
निमित्त होते प्रोड्यूसर आनंद पंडित यांच्या मुलीच्या लग्नाच रिसेप्शनचं
इम्रान आणि मल्लिका याच रिसेप्शनमध्ये एकत्र दिसलेत.
जिथे दोघांनीही रेड कार्पेटवर एकत्र पोझ करत फोटो काढले.
या दरम्यान दोघांनी एकमेकांना मिठी देखील मारली.
इम्रान-मल्लिका या दोघांचे फोटो आता सोशल मीडियामध्ये वायरल होट आहे.
नेटकऱ्यांनी या दोघांच्या फोटोवरती कमेन्टस् केले आहेत.
प्रेक्षकांची मागणी आहे की इम्रान-मल्लिका यांनी पुन्हा एकत्र येऊन काम करावे.