भाग्य दिले तू मला टीव्ही मालिका फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर.



जान्हवी बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल झाली आहे.



आता होणार कल्ला असं म्हणत बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला सुरुवात झाली आहे.



बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धक म्हणून जान्हवी किल्लेकरच्या नावाची चर्चा सुरु होती.



आता ती स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहे.



'कोलीवाडा झिंगला' म्युझिक अल्बमधून अभिनेत्री जान्हवी किल्लेकर लोकप्रिय झाली.



त्यानंतर जान्हवी 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतून घराघरांत पोहोचली.



या मालिकेत ती खलनायकाच्या भूमिकेत दिसली.



जान्हवीने तिच्या अभिनया द्वारे प्रेक्षकांच मनं जिंकलं.



तिच्या या भूमिकेमुळे ती घराघरात पोहचली.