प्रिया बापटचा पावसाळी ट्रेक आणि ओढ्यात धमाल मस्ती! प्रियाने नुकतेच ट्रेकचे फोटो इंस्टाग्राम वरती शेयर केले आहेत! तिने कॅप्शन मध्ये केलेली लहान मुलांसारखी धमाल लिहली आहे जंगलातून चालणे, पक्षांचे आवाज ऐकणे, ओढ्याच्या थंड पाण्यात डुंबणे अश्या गोष्टी प्रियाने केल्याचं पाहायला मिळालं मराठी रंगभूमी, सिनेसृष्टीतही हिंदीत अभिनेत्री प्रिया बापटने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयच्या जोरावर बरंच नाव कमावलं आहे. 2000 साली प्रियानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा तिचा पहिला मराठी चित्रपट. अभिनेता उमेश कामतसोबत तिने 13 वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली. प्रियानं शुभंकरोती, अधुरी एक कहानी आणि दामिनी या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सिटी ऑफ ड्रिम्स या वेब सीरिजमधील प्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मुन्नाभाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाई या हिंदी चित्रपटामध्ये प्रियानं महत्वाची भूमिका साकारली आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री प्रिया बापट हिने कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.