बजरंगी भाईजान या चित्रपटातून फक्त भारतातच नव्हे तर शेजारील राष्ट्र पाकिस्तानात सुद्धा आपल्या अभिनयाने कहर केलेल्या हर्षाली मल्होत्राने गेल्या काही दिवसात इंस्टाग्रामवर कहर केला आहे.
Published by: अदिती पोटे, एबीपी माझा
एकाच चित्रपटातून हर्षालीने फार मोठे नाव कमावले आहे, तसेच मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. ती नेहमीच तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.
बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नी ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री हर्षाली मल्होत्राने तिच्या @harshaalimalhotra_03 या इंस्टाग्राम हँडलवर नवा फोटोशूट शेअर केला आहे.
हर्षालीने बजरंगी भाईजान या सिनेमात चांगलीच वाहवा मिळवली. तिच्या निरागस डोळ्यांनी अनेकांची मतं जिंकली.
बजरंगी भाईजान या हिंदी चित्रपटातील मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्राने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
सोशल मीडियावरील या लूकसाठी हर्षालीने ब्राऊन रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
या स्लिव्हलेस बॉडीकॉन ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाईलमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.