बॉलीवूडमध्ये असणाऱ्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे Nushrratt Bharuccha

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

जी केवळ आपल्या चित्रपटांमुळेच सगळीकडे चर्चेत असते असे नाही. ती आपल्या सौंदर्यासाठी, फॅशनसाठी आणि स्टाईलसाठी सुद्धा चर्चेत असते.

ट्रेडीशनल लुक असो वा मॉडर्न लुक तिचे फॅशन स्टेटमेंट अनेकांसाठी इन्स्पिरेशनल आहे.

आपल्या नॅच्युरल चार्म आणि स्टाईलने तिने आजवर अनेकांची हृदये घायाळ केली आहेत.

मोठ्या मोठ्या प्रसिद्ध डिजाईनर्सच्या स्टनिंग आउटफिट्समध्ये ती आपल्या फॅशनचा जलवा आजवर दाखवत आली आहे.

असाच तिचा एक नवा लुक सध्या समोर आला आहे आणि तुम्ही नुसरतचे चाहते असाल तर नक्कीच तुम्हाला तिचा हा लुक परत तिच्या प्रेमात पाडेल.

नुसरतने नुकतेच काही फोटो शेअर केलेत, ज्यात ती फ्लोरल ड्रेसमध्ये दिसतेय.

या शॉर्ट ड्रेसमध्ये नुसरत खूपच सुंदर दिसतेय.

यासोबतच तिने न्यूड मेकअप केलाय आणि सुंदर हेअरस्टाईल देखील केली आहे.