मराठी बरोबरच हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्य आपलं नाव गाजवणारे लक्ष्या मामा यांचा आज स्मृती दिन
लक्ष्मीकांत बेर्डे हे महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातलं असं एक ताईत आहे; जे पिढ्यान पिढ्या टिकून असेल.
दुःख मनात ठेवून प्रेक्षकांना खळखळून हसवत ठेवण्याचा वसाच त्यांनी जणू त्यांनी हाती घेतला होता.
नाटकं, एकांकिका करत करत अपार मेहनतीनं त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. लक्ष्मीकांत सुरुवातीला सात वर्षं साहित्य संघात नोकरी करीत नाटकं केली.
लक्ष्यामामांचे चुलत बंधू पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘टुरटुर’ नाटकामुळं त्यांना पहिल्यांदा लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी 'शांतेचं कार्ट चालू आहे’ हे नाटक केलं.
या नाटकामुळं त्यांना त्यांचा पहिला सिनेमा मिळाला. ‘हसली की फसली’ हा त्यांचा पहिला चित्रपट, काही कारणामुळं तो प्रदर्शितच झाला नाही.
सिनेमांमध्ये लक्ष्या आला आणि त्यानं जिंकून घेतलं सारं...असंच काहीसं घडलं. ‘लेक चालली सासरला’ हा खऱ्या अर्थानं त्यांचा पहिला सिनेमा ठरला.
त्यानंतर त्याच्या सिनेमांची रांगच आली. ‘धुमधडाका’ हा त्यांचा सिनेमा प्रचंड गाजला, आजही प्रेक्षक हा सिनेमा आवडीनं पाहतात.
प्रेम करूया खुल्लम खुल्ला, आम्ही दोघे राजा राणी, दे दणादण, गडबड गोंधळ, अशी ही बनावाबनवी, एक गाडी बाकी अनाडी, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी, भुताचा भाऊ,हमाल दे धमाल असे अनेक सिनेमे गाजले.
विनोदी भूमिकांसोबत त्यांनी काही गंभीर भूमिकाही केल्या. तर बॉलिवूडमध्येही त्यांनी अनेक सिनेमांत काम काम केलं.
त्यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘एक होता विदूषक’ या सिनेमातली भूमिका.
२००४ साली प्रदर्शित झालेला ‘पछाडलेला’ हा लक्ष्मीकांत यांचा शेवटचा सिनेमा ठरला. त्यानंतर त्यांची तब्येत खालावत गेली आणि १६ डिसेंबर २००४ रोजी या विनोदाच्या बादशाहनं जगाचा निरोप घेतला.