अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. ती आपल्या चाहत्यासांठी नेहमी काहीना काही शेअर करत असते.

Published by: जगदीश ढोले
Image Source: instagram/shweta.tiwari

श्वेता तिवारीने आता बीचवरील खास फोटो शेअर केले असून नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.

Image Source: instagram/shweta.tiwari

अभिनेत्रीने श्वेता तिवारीने टीव्हीवर 'कसौटी जिंदगी की' या मालिकेमुळे लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या.

Image Source: instagram/shweta.tiwari

दरम्यानच्या काळात तिने वैवाहिक आयुष्यालाही सुरुवात केली. दोन लग्नही केले. मात्र, वय वाढत असतानाही श्वेता तिवारीने फिटनेसवर कायम लक्ष दिलं. श्वेता तिवारीला एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे.

Image Source: instagram/shweta.tiwari

मुलगी पलक तिवारी हिनेदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. दोन मुलांची आई असतानाही श्वेता तिवारीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

Image Source: instagram/shweta.tiwari

श्वेता तिवारी नियमितपणे वर्कआउट करते. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी व्यायाम खूप आवश्यक आहे, असं श्वेता तिवारीचं मत आहे.

Image Source: instagram/shweta.tiwari

श्वेताच्या डाएट प्लॅनबद्दल सांगायचं झाल्यास, त्या ब्रेकफास्टमध्ये ब्राउन ब्रेड, अंडी आणि एक कप चहा घेते, जे तिला दिवसभर ऊर्जावान ठेवतं.

Image Source: instagram/shweta.tiwari

लंचमध्ये पराठा, पनीर भुर्जी, सॅलड आणि लो-फॅट दही असतं. श्वेता सॅलड खाणं कधीच चुकवत नाही. कारण ते तिच्या आहारातील सर्व आवश्यक पोषणतत्त्वांचं संतुलन राखतं.

Image Source: instagram/shweta.tiwari

श्वेता असं मानते की, डाएट आणि वर्कआउटनंतर सुद्धा चांगल्या त्वचेसाठी आनंदी राहणं देखील अत्यंत आवश्यक आहे.

Image Source: instagram/shweta.tiwari

श्वेता तिवारी पुरेशी झोप घेण्याकडेही लक्ष देते. तिच्या मते, 8 तासांची झोप शरीराचा थकवा दूर करतेच, शिवाय ती तुम्हाला स्ट्रेसपासून मुक्त ठेवते.

Image Source: instagram/shweta.tiwari