गळ्यात कवड्याची माळ, शत्रूशी दोन हात...स्वराज्याच्या धाकले धनीच्या भूमिकेतील विकीला पाहिलंत का? 'छावा' चा टीझर आज लाँच करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारीत आहे. टीझरमध्ये विकी कौशलचा लूक, अॅक्शन पाहून त्याने या चित्रपटासाठी मेहनत घेतली असल्याचे दिसून आले आहे. डोळ्यात आग, स्वराज्य रक्षणाचा ध्यास घेतलेले छत्रपती संभाजी महाराज हे मुघली सैन्याशी दोन हात करताना दिसत आहे. औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नाचा लूक जबरदस्त दिसून आला आहे. विकी कौशलच्या या लूकवर आणि अॅक्शनवर चाहते फिदा झाले असून त्याचे कौतुक केले आहे. विकी कौशलने टीझर शेअर करताना म्हटले की, स्वराज्याचे रक्षक, धर्माचे रक्षक, छावा- एका साहसी योद्ध्याची महाकाव्य गाथा!