बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या क्रमांवर आहे. ऐश्वर्याची एकूण संपत्ती 800 कोटींच्या आसपास आहे.
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर राज्य करणारी काजोल चित्रपट आणि जाहिरातींच्या माध्यमातून चांगलेच पैसे कमावते. तिची नेटवर्थ 235 कोटी रुपये आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा समावेश आजच्या घडीला हायएस्ट पेड एक्ट्रेसच्या यादीत होतो. तिची संपत्ती 550 कोटी रुपये आहे.
अभिनेत्री दीपिका पादुकोणने अनेक हिट चित्रपटांत काम केलं आहे. अभिनेत्रीची एकूण संपत्ती 500 कोटींच्या आसपास आहे.
अभिनेत्री करीना कपूर अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे. बॉलिवूडसह ओटीटी विश्वातदेखील ती सक्रीय आहे. आज ती 485 कोटी रुपयांची मालकीण आहे.
कतरिना कैफ चित्रपट, जाहिराती आणि ब्यूटी ब्रँडच्या माध्यमातून चांगलेच पैसे कमावते. तिची एकूण संपत्ती 265 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्माची एकूण संपत्ती 255 कोटींच्या आसपास आहे.
'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षित आज जाहिराती, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून चांगलेच पैसे कमावते. तिची एकूण संपत्ती 250 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
रानी मुखर्जी 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रानी मुखर्जी यांची नेटवर्थ 200 कोटींच्या आसपास आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूरची एकूण संपत्ती 123 कोटी रुपयांच्या आसपास आहे.