अभिनेता भूषण प्रधान हा त्यांच्या अंदाजमुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो. त्याचप्रमाणे तरुणींच्या हृदयातील ताईत आणि सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय अशीही भूषणची ओळख आहे. भूषण हा लवकरच जुनं फर्निचर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याआधी भूषणच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे वातावरण चांगलच हॉट झालं आहे. भूषणने त्याच्या सोशल मीडियावर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. पूलमधील या फोटोमुळे अनेक तरुणींना पुन्हा एकदा भुरळ पडली आहे. भूषणने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. भूषण आता महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात झळकणार आहे.