ज्येष्ठ अभिनेते 'अशोक सराफ' यांना महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण' प्रदान करण्यात आला आहे. (Photo credit : Facebook/Devendra Fadnavis)



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अशोक सराफ यांना हा पुरस्कार देण्यात आला. (Photo credit : Facebook/Devendra Fadnavis)



अशोक सराफ यांची कारकीर्द खूप मोठी आहे. (Photo credit : Facebook/Devendra Fadnavis)



180 मराठी सिनेमे, 52 हिंदी सिनेमे, 12 नाटकं आणि त्याचे हजारो प्रयोग, 10 टिव्ही मालिका आणि कमावलेले अगणित चाहते. (Photo credit : Facebook/Devendra Fadnavis)



भन्नाट टायमिंग, भूमिकेतलं वैविध्य आणि सहजता या जोरावर अशोक सराफ यांनी रंगमंच, चित्रपट आणि मालिका या तिन्हींमध्ये आपला ठसा उमटवला. (Photo credit : Facebook/Devendra Fadnavis)



ऐंशीच्या दशकात लक्ष्यामामा आणि अशोकमामा या जोडीने महाराष्ट्राला खळखळून हसवलं. (Photo credit : Facebook/Devendra Fadnavis)



अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, एक गाडी बाकी अनाडी हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. (Photo credit : Facebook/Devendra Fadnavis)



हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी 'दामाद' या चित्रपटापासून त्यांच्या दमदार अभिनयाची एन्ट्री केली. (Photo credit : Facebook/Devendra Fadnavis)



'करण अर्जुन', 'कोयला', 'येस बॉस', 'जोडी नं.१' हे अशोक सराफ यांचे हिंदीतील काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. (Photo credit : Facebook/Devendra Fadnavis)



अमेरिकेतील सिएटल येथे झालेल्या बृहन्महाराष्ट्र कन्व्हेन्शनमध्ये त्यांनी विजय केंकरे दिग्दर्शित 'हे राम कार्डिओग्राम' या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही पाऊल ठेवले आहे. (Photo credit : Facebook/Devendra Fadnavis)