भारत-पाकच्या लेस्बियन कपलचा ब्रेकअप झाला आहे.
लोकप्रिय भारतीय इन्फ्लुएंसर अंजली चक्राचा तिची पाकिस्तानी जोडीदार सूफी मलिकसोबत ब्रेकअप झाला आहे.
अंजली चक्रा आणि सूफी मलिकने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली आहे. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार होते. पण गर्लफ्रेंडने धोका दिल्याने त्यांचा ब्रेकअप झाला आहे.
सूफीच्या अंजलीला फसवल्याने त्यांचा ब्रेकअप झाला आहे.
अंजलीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,सूफी आणि मी गेल्या पाच वर्षांपासून एकत्र होतो. पण तिच्या एका चुकीमुळे आम्ही आमचं नातं संपवलं आहे.
अंजली आणि सूफी 2019 मध्ये भारतीय आणि पाकिस्तानी आऊटफिटमध्ये रेन डान्स करताना दिसून आल्या होत्या.
1 जानेवारी 2024 रोजी अंजली आणि सूफीचा साखरपुडा झाला.
सूफी आणि अंजली लवकरच लग्नबंधनात अडकणार होते.
आता त्यांचं लग्न होणार नसल्याने चाहते नाराज झाले आहेत.