बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू अखेर विवाहबंधनात अडकली असल्याचे वृत्त आहे.

तापसीने उदयपूर येथे गुपचूपपणे लग्नगाठ बांधली आहे.

जवळचे नातेवाईक आणि काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये 23 मार्च रोजी हा विवाहसोहळा पार पडला असल्याचे वृत्त आहे.

टीम इंडियाचा बॅडमिंटन दुहेरी संघाचा प्रशिक्षक असलेला प्रियकर मॅथियास बो सोबत तिने विवाह केला.

तापसी ही प्रियकर मॅथियाससोबत मागील 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.

कुटुबांशी निगडित असलेल्या सूत्रांनी माहिती दिली की,

दोघांचा विवाह सोहळा उदयपूर येथे पार पडला.

लग्नाची मीडियामध्ये चर्चा होऊ नये यासाठी दोन्ही जोडप्यांनी खबरदारी घेतली होती.

हे दोघेही मीडिया आणि लाइमलाइटपासून अंतर ठेवणारे असल्याचेही या सूत्राने म्हटले.

हा विवाह सोहळा अतिशय खाजगी होता.