तमन्नाने नुकतंच एक नवं फोटोशूट शेअर केलंय यात ती राधा बनलेली दिसत आहे. कृष्ण आणि राधा या थीमला अनुसरून केलेलं हे फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे. तिचं सौंदर्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासारखं आहे. तमन्नाने आपल्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात केली होती. अभिनेत्री तमन्ना भाटियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने विशेष ओळख निर्माण केली आहे. तमन्ना केवळ तामिळ सिनेमातच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्येही झळकली आहे. तमन्ना भाटिया ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री एका चित्रपटासाठी दीड ते दोन कोटी रुपये घेते. तमन्ना भाटियाचे इंस्टाग्राम वर 26.2 M फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असते.