‘नागिन’ फेम टीव्ही अभिनेत्री सध्या तिच्या आगामी ‘द भूतनी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Published by: अदिती पोटे, एबीपी माझा
एकता कपूरच्या टीव्ही शोमध्ये ‘नागिन’ झाल्यानंतर, मौनी रॉय आता ‘द भूतनी’ चित्रपटात भूत बनून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘द भूतनी’ १८ एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
कायम आपल्या आऊटफिट आणि क्लासी लुक्समूळे चर्चेत राहणारी मौनी तिच्या बदललेल्या अवतारामुळे आता ट्रोल होतेय.
ग्लॅमरस मौनीचे प्रचंड चाहते आहेत. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा तिचा लूक पाहून हे चाहतेसुद्धा टीका करताना दिसले.
या फोटोंमध्ये मौनीचा लूक बराच बदलल्याचे दिसत आहे. तिच्या चेहऱ्याचा आकार आणि रंग यामध्ये झालेला फरक चाहत्यांनी अगदी सहज पकडला.
ज्यावरून मौनीने पुन्हा एकदा सर्जरी केल्याचे बोलले जात आहे.
टीव्ही शोमधून प्रकाशझोतात आलेली मौनी राय आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असून तिचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून तिला विशेष ओळख मिळाली होती.