नोरा फतेही (Nora Fatehi) ही सध्याच्या घडीला बॉलीवूडमधली डान्सिंग क्विन म्हणून ओळखली जाते.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

तसेच तिच्या डान्सिंग मुव्ह्जमुळे नोरा कायमच चर्चेत राहिलीये.

डान्स रिॲलिटी शोमध्ये सहभागी होण्यापासून ते टीव्हीवर प्रसिद्ध जज होण्यापर्यंत नोराने खूप मोठा पल्ला गाठला आहे.

नोराची डान्सिंग आणि तिच्या सौंदर्यावर अनेक चाहते फिदा आहे. मोठ्या संघर्षानंतर नोराने सिनेइंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

नोराने नुकतेच तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

नोरा यात गोल्डन ड्रेसमध्ये दिसत आहे.

तिचा हा ड्रेस खूपच सुंदर आणि वेगळा आहे. यासोबत तिने सटल मेकअप केला आहे.

नोरा फतेही आणि अभिषेक बच्चन सध्या त्यांच्या आगामी 'बी हॅप्पी' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.

हे परिधान करून नोरा इतकी सुंदर दिसत होती की फोटोंवरून नजर हटवणे कठीण झाले होते.

नोराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती बी हॅप्पीमध्ये दिसणार आहे.