अभिनेत्री हिना खान (Hina Khan) टीव्ही विश्वातील लोकप्रिय नाव आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली आहे.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत हिना खान अक्षराच्या भूमिकेत होती.

हिनाने 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका चांगलीच गाजवली आहे.

'बिग बॉस'सारख्या सारख्या मालिकेच्या माध्यमातून तिने छोटा पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बिग बॉसच्या माध्यमातून हिना खानने आपली प्रतिमा पूर्णपणे बदलली. हिना खान फॅशनिस्टा ठरली होती.

नागिन सारख्या मालिकांमध्येही तिने काम केलं.

अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ही सध्या स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे.

हिनावर सध्या किमोथेरेपीचे उपचार सुरू आहेत. हिना आपल्या चाहत्यांसह उपचाराचे सगळे अपडेट्स शेअर करत असते.

यादरम्यान सुद्धा हिनाने तिचं काम सुरु ठेवलंय, नुकताच तिने एक खास लूक शेअर केलाय ज्यात ती तिचे बारीक केस फ्लोन्ट करत आहे.

तिचा हा बोल्ड आणि सुंदर लूक सध्या चर्चेचा विषय ठरतोय.