बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. ती तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देते

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

नोरा फतेहीच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास तिने 'मडगाव एक्स्प्रेस', 'सत्यमेव जयते', 'स्ट्रीट डान्सर', 'स्त्री' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

अभिनेत्री नोरा फतेही हिने नवीन फोटोशूट करत सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

ब्रायडल लूकमध्ये नोराने स्वतःचे फोटो पोस्ट केले आहेत. सध्या नोराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री नोरा फतेही कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील नोरा हिने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

क्लासी लूकमध्ये नोराने फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे. सध्या नोराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यात तिच्या लांब गजऱ्याने लक्ष वेधलं आहे.

अभिनेत्री नोरा फतेही हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे नाहीतर, डान्स आणि लूकमुळे चर्चेत असते.

नोरा कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.