पंचक या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या ट्रेलरमधील डायलॉग्सनं आणि कलाकारांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
डॉ. श्रीराम नेने यांच्या पंचक या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता.
या टीझरला नेटकऱ्यांनी पसंती मिळाली होती.
त्यानंतर या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते.
आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
पंचक या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला काही कलाकार धावताना दिसत आहेत.
पंचक या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर,आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता धुरी सागर शोध, संपदा कुलकर्णी ,आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, गणेश मयेकर आणि आरती वडगबाळकर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे
माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.