अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी त्यांची मुलगी 'राहा'चा चेहरा पहिल्यांदा पापाराझीसमोर रिव्हिल केला.



आलिया आणि रणबीर हे सोमवारी ख्रिसमस लंच प्रोग्रॅमसाठी गेले होते, यावेळी त्यांच्यासोबत राहा देखील होती.



आलिया ही अनेकवेळा राहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.



पहिल्यांदाच आलिया आणि रणबीर यांनी राहासोबत पापाराझीसमोर फोटोसाठी पोज दिल्या.



ख्रिसमस लंच प्रोग्रॅमसाठी कपूर कुटुंबानं खास लूक केला होता.



यावेळी राहा ही व्हाईट फ्रॉक, दोन पोनी टेल आणि रेड शूज अशा क्यूट लूकमध्ये दिसली.



राहाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.



'राहा'वर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.



सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमधील राहाच्या क्युटनेसनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.



राहाचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 रोजी झाला.