22 जानेवारीला मंदिरात प्रभू श्री रामलल्लाची स्थापना होणार आहे.



राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं आहे.



अमिताभ बच्चन,रजनीकांत,अक्षय कुमार,अनुपम खेर,माधुरी दीक्षित अशा अनेक दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे.



दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, आलिया भट्ट, टायगर श्रॉफ, सनी देओल, अजय देवगण, आयुष्मान खुराना यांसारख्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला आमंत्रित करण्यात आलं आहे.



अभिनेता प्रभास,रजनीकांत,यश आणि धनुष या साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांना देखील आमंत्रण मिळाले आहे.



प्रसिद्ध निर्माता महावीर जैन यांच्याशिवाय दिग्दर्शक राजकुमार हिरानी, ​​संजय लील भन्साळी, रोहित शेट्टी, चिरंजीवी आणि ऋषभ शेट्टी यांच्या नावाचा समावेश आहे.



क्रिकेटपटू आणि उद्योगपतींनाही आमंत्रित करण्यात आले आहे.



सचिन तेंडुलकर, विराट कोहली, मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि रतन टाटा यांच्या नावांचा समावेश आहे.



राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला वारकरी संप्रदायातील संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत.



मुख्य समारंभासाठी विश्व हिंदू परिषदेचे सुमारे 100 सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 25 अधिकाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.