केवीन पीटरसनने क्रिकेट आणि फुटबॉलमधील मोठी नावं असणाऱ्या कोहली आणि रोनाल्डो यांची तुलना केली आहे.



दोघंही आपआपल्या खेळातील मोठी नावं असून त्यांची ब्रँड व्हॅल्यूही तगडी आहे.असं पीटरसन म्हणाला.



रोनाल्डो अव्वल दर्जाचा फुटबॉलपटू असून पोर्तुगालचा कर्णधार आहे.



विराट आता जरी भारताचा कर्णधार नसला तरी त्याला आजही संघात महत्त्वाचं स्थान आहे.



पीटरसनने कोहलीबाबत म्हणाला, कोहली हवं तसं योगदान संघाला देऊ शकत नाही. त्याच वेळी त्याने कोहलीची तुलना रोनाल्डोशी केली.



मँचेस्टर युनायटेडचा खेळाडू आणि पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डोकडे कोहलीने पाहायला हवे असं पीटरसन म्हणाला.



रोनाल्डो संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करत असतो, असं पीटरसन म्हणाला.



तशीच कामगिरी विराटनेही करायला हवी असंही पीटरसन म्हणाला आहे. 



रोनाल्डो आणि कोहली यांची नावं याआधीबी एकत्र घेतली गेली आहेत.



कोहलीने रोनाल्डो त्याचा आवडता क्रिडापटू असल्याचं म्हटलं होतं.