इंग्लंडला एकमेव एकदिवसीय चषक जिंकवून देणारा कर्णधार इयॉन मॉर्गन निवृत्त वयाच्या 35 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी एकदिवसीय कर्णधार म्हणजे इयॉन मॉर्गन इंग्लंडला एकमेव एकदिवसीय चषक जिंकवून देणारा कर्णधार इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) याच्या निवृत्तीची माहिती आयसीसीने ट्वीट करत दिली. 2006 साली आंतरराष्ट्रीय सामन्यांत पदार्पण करणाऱ्या मॉर्गनने 16 वर्षानंतर निवृत्ती स्वीकारली आहे. आधी 2006 ते 2009 आयर्लंडसाठी क्रिकेट खेळलेल्या मॉर्गनने पुढील सर्व वर्षे इंग्लंडसाठी क्रिकेट खेळला. 35 वर्षीय मॉर्गन मर्यादीत षटकांतील उत्तम कर्णधार असण्यासह इंग्लंडकडून धावा करण्यातही आघाडीवर होता. त्याने आयर्लंड आणि इंग्लंडकडून मिळून 7 हजार 701 धावा 14 शतकांसह केल्या आहेत. याशिवाय मॉर्गन एक अत्यंत यशस्वी टी20 खेळाडू देखील आहे. 115 टी20 सामन्यात 136.18 च्या सरासरीने 2 हजार 458 धावा त्याने केल्या आहेत. मॉर्गनने 126 सामन्यात इंग्लंडचं नेतृत्त्व करत 76 सामने संघाला जिंकवून दिले.