लंडनच्या (London) केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval) येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 10 विकेट्सनं विजय मिळवलाय.
भारताच्या विजयात वेगवाग गोलंदाज जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) मोलाटा वाटा उचलला.
या सामन्यात जसप्रीत बुमराहनं सुरुवातीपासूनचं आक्रमक गोलंदाजी करत इंग्लंडच्या सहा फलंदाजाला माघारी धाडलं.
या कामगिरीसह जसप्रीत बुमराहनं एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणारे गोलंदाज यादीत स्थान मिळवलं आहे.
एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा स्टुअर्ड बिन्नी अव्वल स्थानी आहे. त्यानं 2014 मध्ये बांग्लादेशविरुद्ध 4 धावा देऊन सहा विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर 1993 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध 12 धावा देऊन सहा विकेट्स घेणारे माजी फिरकीपटू अनिल कुंबळे दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या यादीत जसप्रीत बुमराह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्ध काल खेळण्यात आलेल्या पहिल्या दिवसीय सामन्यात जसप्रीत बुमराहनं 19 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या आहेत.
जसप्रीत बुमराहनंतर अशिष नेहरा आणि कुलदीप यादवचा क्रमांक लागतो.
आशिष नेहरानं 2003 मध्ये इंग्लडविरुद्ध 23 धावा खर्च करून 6 विकेट्स घेतल्या होत्या.
तर, कुलदीप यादवनं 2018 साली खेळण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात 25 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.