भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून इंग्लंड विरुद्ध भारत एकमात्र कसोटी सामना खेळला जाणार आहे.



बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबस्टन क्रिकेट ग्राउंडवर येत्या 1 जुलैपासून या सामन्याला सुरुवात होणार आहे.



यापूर्वीच कर्णधार रोहित शर्माची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय.



त्याच्याजागी मयांक अग्रवालची (Mayank Agarwal) संघात वर्णी लागलीय. बीसीसीआय रोहित शर्माच्या फिटनेसवर बारीक लक्ष ठेवून आहे.



मयांक अग्रवालनं भारतासाठी 21 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात 41. 33 च्या सरासरीनं 1 हजार 488 धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतकांचा समावेश आहे.



तो इंग्लंड विरुद्धच्या या कसोटी सामन्यात खेळला तर त्याचा हा इंग्लंड विरुद्ध पहिलाच कसोटी असेल.



त्यानं भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत.



त्यानं 2018 आणि 2021 दरम्यान आस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळताना 273 धावा केल्या आहेत.



बर्मिंगहॅम कसोटी सामना भारतासाठी किती महत्वाचा आहे? हे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं.