डबलिनच्या (Dublin) द व्हिलेज स्टेडियमवर (The Village) रविवारी भारत आणि आयर्लंड यांच्यात पहिला टी-20 सामना खेळवण्यात आला.
पावसानं व्यत्यय आणलेल्या या सामन्यात भारतानं सात विकेट्स राखून आयर्लंडचा पराभव केला.
या सामन्यातील पॉवर प्लेमध्ये विकेट घेऊन भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) नव्या विक्रमाला गवसणी घातलीय.
टी-20 क्रिकेटच्या पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भुवनेश्वर कुमार पहिला भारतीय ठरलाय.
टी-20 मध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वर कुमार सॅम्युअल बद्री आणि किवी वेगवान गोलंदाज टीम साऊथी 33 विकेट्ससह संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर होता.
मात्र, आयर्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भुवनेश्वर कुमारनं एक विकेट घेऊन सॅम्युअल बद्री आणि टीम साऊथीला मागं टाकलंय.
आयर्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 मध्ये भुवनेश्वर कुमारनं शानदार गोलंदाजी करत पहिल्याच षटकात भारताला यश मिळवून दिलं.
या सामन्यात भुवनेश्वरनं 3 षटकात 16 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. सुरुवातीला भुवनेश्वरच्या गोलंदाजीसमोर खेळणे आयर्लंडसाठी कठीण जात होतं.