जगासह भारतातही कोरोना विषाणूचा फैलाव अद्याप कायम आहे


कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे


रविवारी दिवसभरात देशात 17,073 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे


आतापर्यंत देशात पाच लाखआंहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


देशभरात राबवण्यात आलेल्या कोरोना लसीकरणामुळे कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी करण्यात यश आलं असलं, तरीही अद्याप कोरोना विषाणूच्या संसर्गावर पूर्णपणे मात करता आलेली नाही


देशात सध्या 94 हजारांहून अधिक रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत आहेत.


गेल्या 24 तासांत देशात 15 हजार 208 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत


देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.57 टक्क्यांवर पोहोचले आहे


देशात एकूण 4 कोटी 27 लाख 87 हजार 606 रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे


दैनंदिन रुग्ण सकारात्मकता दर 5.62 टक्क्यांवर पोहोचला आहे


कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत भारतात 5 लाख 25 हजार 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.