मुंबई एनसीबीनं मोठी कारवाई करत तब्बल 286 किलो गांजा जप्त केला आहे.  

 आंतरराज्यीय अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटवर कारवाई करताना NCB मुंबईने सोलापूर-मुंबई महामार्गावर 286 किलो गांजा जप्त केला आहे.

अंदाजे 3.5 कोटी रुपए किमतीचा हा उच्च दर्जाचा गांजा जप्त केला आहे. 

एनसीबीच्या टीमनं दोन दिवस सोलापूर-मुंबई महामार्गावर सापळा रचला.

एनसीबीच्या टीमनं दोन दिवस सोलापूर-मुंबई महामार्गावर सापळा रचला.

यावेळी त्यांना दोन प्रवासी असलेले एक संशयास्पद वाहन आढळून आले. त्यांनी या वाहनाला थांबवत तपासणी केली.

तपासणीत कारमध्ये तपकिरी रंगाच्या चिकट टेपची 95 पाकिटे लपवून ठेवल्याचे आढळून आले.

तपासणीत कारमध्ये तपकिरी रंगाच्या चिकट टेपची 95 पाकिटे लपवून ठेवल्याचे आढळून आले.

या पॅकेट्समध्ये उच्च दर्जाचा गांजा ठेवण्यात आला होता.

या पॅकेट्समध्ये उच्च दर्जाचा गांजा ठेवण्यात आला होता.

या पाकिटांमध्ये एकूण 286 किलो गांजा आढळून आला असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे, असं अमित घावटे, झोनल डायरेक्टर एनसीबी मुंबई यांनी सांगितलं आहे.