इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात हार्दिक पांड्याच्या वन मॅन शो पाहायला मिळाला. साउथॅम्प्टनच्या द रोज बाऊल स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात हार्दिक पांड्यानं चमकदार कामगिरी बजावली. त्यानं फलंदाजीसह गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. या कामगारीच्या जोरावर हार्दिक पांड्यानं खास विक्रमाला गवसणी घातलीय. टी-20 क्रिकेटच्या एका सामन्यात 50+ धावा आणि चार विकेट्स घेणाऱ्या गोलदाजांच्या पंक्तीत त्यानं स्थान मिळवलं आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या हार्दिक पांड्यानं 29 चेंडूत 51 धावांची खेळी केली. त्यानंतर इंग्लंडच्या चार फलंदाजांना माघारी धाडून विक्रम रचला. या सामन्यात त्यानं 33 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या आहेत. भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या हार्दिक पांड्याला या सामन्यात समानावीर म्हणून गौरवण्यात आलं.