देशातील कोरोना संसर्गाचा फैलाव अद्यापही सुरुच आहे यामध्ये दिवसागणिक चढ-उतार पाहायला मिळत आहे, त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 815 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी दिवसभरात 38 रुग्णांनी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे एकीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग आणि दुसरीकडे पावसाळ्याच पसरणाऱ्या साथीच्या रोगांमुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे सध्या देशात 1 लाख 22 हजार 335 रुग्ण कोरोनो संक्रमित आहेत गुरुवारी दिवसभरात 15 हजार 899 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे आतापर्यंत भारतात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 29 लाख 37 हजार 876 वर पोहोचली आहे देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गुरुवारी 2 हजार 678 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे