भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे



'प्रिंस ऑफ कोलकाता', 'दादा' या नावांनी प्रसिद्ध असलेला सौरव गांगुलीचा जन्म 8 जुलै 1972 रोजी झाला.



भारतीय क्रिकेटच्या यशस्वी कर्णधाराच्या यादीत सौरव गांगुलीचं नाव घेतलं जात आहे.



सौरव गांगुलीनं भारतीय संघाची धुरा संभाळण्याअगोदर भारतीय संघ खूप संघर्ष करत होता.



परंतु, सौरव गांगुलीनं युवा खेळाडूंना सोबत घेऊन एक मजबूत संघ तयार केला.



सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघ 2003 मध्ये आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचला होता.



ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला,पण भारतीय संघाला नवी दिशा मिळाली.



सौरव गांगुलीनं त्याच्या कारकिर्दीत 113 कसोटी, 311 एकदिवसीय आणि आयपीएलमधील 59 सामने खेळले आहेत.



सौरवनं कसोटी क्रिकेटमध्ये 7 हजार 212 धावा केल्या आहेत. ज्यात 16 शतक आणि एका द्विशतकाचा समावेश आहे.



एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 11 हजार 363 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 धावा इतकी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 22 शतक आणि 72 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहे.