स्टार किड असूनही अनन्या पांडेने इंडस्ट्रीत स्वतःच्या जोरावर एक खास स्थान मिळवले आहे. तर अनन्या सतत अनेक प्रोजेक्टसाठी साइन करत असते. त्याचबरोबर ती तिच्या लूकमुळेही चर्चेत आहे. आता पुन्हा अनन्याचे नवीन फोटोशूट तिच्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. आता लेटेस्ट लूकमध्ये अनन्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट सारखा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. या फोटोशूटसाठी अनन्याने तिचे केस बांधले असून कानात गोल्डन कानातले घातले आहेत. यासोबत तिने पांढऱ्या रंगाची हील्स कॅरी केली आहेत. अनन्याच्या आगामी चित्रपटांकडे पाहता, ती लवकरच साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत 'लिगर' या पॅन इंडिया चित्रपटात दिसणार आहे. (photo:ananyapanday/ig) (photo:ananyapanday/ig) (photo:ananyapanday/ig)