बारामती

यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंचा विजय झाला, तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे.

सोलापुर

सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा विजय झाला आहे, तर भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव झाला आहे.

माढा

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांचा विजय झाला. भाजपचे रणजीतसिंह नाईक-निंबाळकर पराभूत झाले आहेत.

सांगली

सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. भाजपचे संजय काका पाटील पराभूत झाले आहेत.

उत्तर मध्य मुंबई

उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आहे.

दक्षिण मध्य मुंबई

दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंचा पराभव झाला आहे.

दक्षिण मुंबई

दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी विजय मिळवला असून शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा विजय झाला आहे.

मुंबई (उत्तर-पश्चिम)

रवींद्र वायकर हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकरांचा पराभव केला.

मुंबई उत्तर

मुंबई उत्तर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा विजय झाला असून काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा पराभव झाला आहे.

अमरावतीत

अमरावतीत भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे. अमरावतीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे बहुमताने निवडून आले आहेत.

Thanks for Reading. UP NEXT

बॉलीवूड सोडून कंगणाची एंट्री थेट संसदेत?

View next story