अहमदनगर

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निलेश लंके यांचा विजय झाला असून सुजय विखे यांचा पराभव झालाय.

अकोला

अकोल्यात भाजपच्या अनुप धोत्रे यांचा विजय झाला. असून काँग्रेसच्या अभय पाटील यांचा पराभव झाला आहे.

हातकणंगले

हातकणंगले मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने विजयी झाले, त्यांनी ठाकरे गटाच्या सत्यजीत पाटील यांचा पराभव केला.

पालघर

पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा बहुमताने विजयी झाले आहेत. तर ठाकरे गटाच्या भारती कामडी यांचा पराभव झाला आहे.

नंदुरबार

नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी झाले आहेत. तर भाजपच्या हिना गावित यांचा पराभव झाला आहे.

शिरुर

शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विजय झाला आहे, अमोल कोल्हे हे भरघोस मतांनी निवडून आले आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

रत्नागिरीत भाजपच्या नारायण राणेंचा दणदणीत विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत पराभूत झाले आहेत.

मावळ

मावळमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरंग बारणेंचा विजय झाला आहे, तर ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांचा पराभव झाला आहे.

रायगड

रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे विजयी झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या अनंत गिते पराभूत झाले आहेत.

काँग्रेस

काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचा नांदेडमध्ये विजय झाला असून भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झाला आहे.

Thanks for Reading. UP NEXT

1.विजयी उमेदवारांची यादी!

View next story