विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. मात्र, निवडणुकांचं बिगुल वाजण्याच्या सर्वजण प्रतीक्षेत आहेत. राजकीय पक्षांनी देखील मोठी तयारी केली आहे, सभा, दौरे, पक्षांतर, भेटीगीटी, उमेदवारांची चाचपणी देखील सुरू आहे, अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दोन चार दिवसात आचारसंहिता लागणार आहे. तुम्ही निवेदन दिल्यावर ती काम मार्गी लागण अवघड आहे असं अजित पवारांनी आज म्हटलं आहे.