भाजपचा हरियाणातील सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये वाढताना दिसत असताना त्यामागे आरएसएसची मेहनत असल्याचे बोलले जात आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत आरएसएसने आपली पूर्ण ताकद लावली होती. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे सर्व दिग्गज रॅली काढून जनतेला संबोधित करत असताना, दुसरीकडे आरएसएस तळागाळात काम करत मतदारांना आपल्याकडे वळवले आहे. गेल्या चार महिन्यांत आरएसएसने हरियाणात 16 हजार छोट्या सभा घेतल्या. विशेष म्हणजे यात त्यांनी गैर-जाट मतदारांना जिंकण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपला यंदाच्या निवडणुकीत हरियाणात सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी भाजपला हरियाणात इतक्या मोठ्याप्रमाणावर यश मिळाले नव्हते.