जुलाना मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार कुस्तीपटू विनेश फोगाट सध्या 4500 हजार मतांनी आघाडीवर आहे. विनेश फोगाटच्या विरोधात भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी रिंगणात आहेत. जुलाना विधानसभा जागेवर एकूण 12 उमेदवार मैदानात उतरले आहेत. यामध्ये सध्या भाजपचे योगेश बैरागी जुलाना विधानसभेतून पिछाडीवर आहेत. विनेश फोगाट काँग्रेसच्या तिकिटावर हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 लढवत आहेत. विनेश फोगाट जींद जिल्ह्यातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. जुलाना विधानसभा जागेवर एकूण 12 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. 6 सप्टेंबरला विनेशने ऑलिम्पिक कुस्तीपटू बजरंग पुनियासोबत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर काँग्रेसने जुलानामधून विनेश फोगाटला तिकीट दिली.