जर कपडे इस्त्री केल्याशिवाय घातले तर ते फार विचित्र दिसतात. पण काही वेळेस इस्त्रीमध्ये काही बिघाड झाला तर इस्री करणं राहून जातं. अशावेळी तुम्ही हेअर ड्रायरचा वापर इस्री म्हणून करु शकता. त्यासाठी तुमचे कपडे आधी सपाट जागेवर ठेवा. त्यावरुन आता हेअर ड्रायर फिरवा. काही वेळात ड्रायरच्या गरम हवेमुळे कपड्यांवर पडलेल्या सुरकुत्या निघून जातील. तसेच कपडे धुतल्यानंतर त्यांना व्यवस्थिती झाडून वाळत घालावे. तसेच पातेल्यात पाणी गरम करुन त्याचा तुम्ही इस्त्री म्हणून वापर करु शकता. कपडे इस्त्री करण्यासाठी तुम्ही हेअर स्ट्रेटनरचा देखील वापर करु शकता.