अर्थात टोमॅटोचे सेवन योग्य पद्धतीनेच केले पाहिजे.

जर तुम्ही त्यांच्यावर मीठ टाकले किंवा तीव्र आचेवर शिजवले तर त्यांचे पौष्टिक आणि हृदय-संरक्षणात्मक फायदे वाफ बनून निघूनच जातात

म्हणूनच भारतीय लोक त्यांच्या आहारात टोमॅटोचा भरपूर वापर करत असले तरी त्यांना त्याचे पौष्टिक फायदे मिळत नाहीत.

टोमॅटोच्या सॅलडवर मीठ शिंपडले तरी त्याचे पोषण मूल्य नाहीसे होते.

हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी सर्वात अनुकूल आहार म्हणजे टोमॅटो कच्चा खाणे.

फार फार तर आपण ऑलिव्ह ऑइल टाकून टोमॅटो खाऊ शकता.

तुमच्या आहारात टोमॅटोचा योग्य प्रकारे समावेश करण्यासह शरीराला व्यायाम आणि झोप सुद्धा दिल्याने तुमचा रक्तदाब मर्यादेत ठेवण्यास नक्कीच मदत होईल

योग्य वेळ आराम करणं सुध्दा गरजेचं आहे

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.