लिंबू आपल्या आरोग्याकरता मोठ्या प्रमाणात फायदेशीर आहे. लिंबात व्हिटामीन सी सोबतच व्हिटामीन ए, व्हिटामीन बी , फायबर , प्रोटीन , कॅल्शियम , पोटॅशिअम , सोडियम यासारखी पोषक तत्वे असतात. यात व्हिटामीन सी , अँडीआॅक्सीडेंट आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याकारणाने हृदयरोग तुम्हाला होऊ शकत नाही. लिंबाचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात वाढते. तर गरम पाण्यात लिंबू आणि मध मिसळूव प्यायल्याने सर्दी , खोकला कमी होण्यास मदत होते. लिंबामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. यात असणारे सॉल्युबल पेक्टिन फायबर लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त आहे. लिंबाच्या सालीचे सेवन केल्याने पचन चांगले होण्यास मदत होते. लिंबात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे चेहरा चमकदार आणि मऊ होण्यास मदत होते आणि ब्लॅकहेड्स देखील निघून जातात. तुम्हाला मधूमेहाचा त्रास असेल तर तुम्ही लिंबाचे सेवन करू शकता. अनेकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ते खूप काही करतात. लिंबू पाणी प्यायल्याने ही समस्या दूर होऊ शकते.