गोड बुंदी, बर्फीचे, लाडूचे तुकडे उरल्यास दूध आणि ब्रेड घालून खीर किंवा पुडींग तुम्ही बनवू शकता.

आमरस, श्रीखंड आंबट झाल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दूधात विरघळून घालावा. आंबटपणा निघून जातो.

गुलाबजम करताना खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. त्यामुळे पाक चांगला मुरतो.

कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा चिरून घालण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे धिरडी कुरकुरीत होतात.

ताकाची कढी करताना त्यात शेंगादाण्याची पेस्ट करून घातल्यास कढी फाटत नाही.

पालकाच्या भाजीच पुदीन्याची पानं घालून त्यावरून लिंबू पिळल्यास भाजीची चव वाढते.

दह्याचे विरजण लावताना त्यात कडीपत्त्याची दोन-तीन पाने टाकावीत. दह्याला सुगंध येतो.

मटार , भोपळी मिरची या भाज्या आधी हळद, मीछ घातलेल्या पाण्यात शिजवाव्यात.यामुळे भाजीचा रंग हिरवा राहतो.

अळूवडी करताना पाने पुसून घेतल्यानंतर त्यावर तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे. यामुळे वडी कुरकुरीत होते.

लाल भोपळा , कलिंगड , खरबूज यांच्या बिया वाळवाव्यात. पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

पावभाजी करताना त्यात बीट किसून घालावे. त्यामुळे पावभाजीला चांगला रंग येतो.