बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा'डंकी'हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला.

रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 70 कोटींपेक्षा अधिक कमाई केली.

'डंकी' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 29.2 कोटींची कमाई केली.

दुसऱ्या दिवशी 20.5 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 26 कोटींची कमाई केली आहे.

एकंदरीत रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 75.32 कोटींचा गल्ला जमवला आहे.

'डंकी' या सिनेमाने जगभरात 103 कोटींचा गल्ला पार केला.

'डंकी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राजकुमार हिरानी यांनी सांभाळली आहे.

120 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.

या सिनेमात शाहरुखसह तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन ईरानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

'हा सिनेमा किती कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.