सातारा आणि रत्नागिरीला जोडणारा खेड तालुक्यापासून 25 किलोमीटरवर असलेला सह्याद्री कुशीतील नागमोडी वळणाचा रघुवीर घाट.

सातारा आणि रत्नागिरीला जोडणारा खेड तालुक्यापासून 25 किलोमीटरवर असलेला सह्याद्री कुशीतील नागमोडी वळणाचा रघुवीर घाट.

ABP Majha
पावसाळ्यात काळ्या कपारीवर उगवलेल्या हिरव्यागार गवताच्या शालूने आणि त्यात फेसळणारे धबधब्यांनी पर्यटकांनी भुरळ घातली आहे.

पावसाळ्यात काळ्या कपारीवर उगवलेल्या हिरव्यागार गवताच्या शालूने आणि त्यात फेसळणारे धबधब्यांनी पर्यटकांनी भुरळ घातली आहे.

ABP Majha
नागमोडी वळणातून प्रवास करतांना शेकडो प्रवाहित झालेले धबधबे आपल्याला पाहायला मिळतील.

नागमोडी वळणातून प्रवास करतांना शेकडो प्रवाहित झालेले धबधबे आपल्याला पाहायला मिळतील.

ABP Majha
याच नागमोडी वळणातून प्रवास करत पुढे-पुढे जात असताना दाट धुक्याची चादर सर्वत्र पसरलेली आपल्याला दिसते.

याच नागमोडी वळणातून प्रवास करत पुढे-पुढे जात असताना दाट धुक्याची चादर सर्वत्र पसरलेली आपल्याला दिसते.

ABP Majha

सह्याद्रीच्या पर्वत रांगातून फेसळणारे असंख्य धबधबे खळखळत वाहत वाहत शिंदी गावातील नदीला मिळतात.

ABP Majha

एका बाजूला शिरगाव-खोपीच डूबी धरण तर दुसऱ्या बाजूला उंच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा यातून उडणारे तुषार जणू काही गगनाला गवसणी घालतात.

ABP Majha

कातळावर उगवलेल्या हिरव्या गार गवताबरोबरच याच कातळावर रंगी बेरंगी खेकडे इथे पाहायला मिळतात.

ABP Majha

या रघुवीर घाटाची सफर म्हणजे एक अविस्मरणीय वर्षा सहल. या ठिकाणी जिल्ह्यातील तसेच जिल्हा बाहेरील शेकडो पर्यटक मौज मजा करण्यासाठी इथे येतात.

ABP Majha

निसर्गाने कोकणाला भरभरुन दिले आहे. त्यात पावसाळ्यात कोकणातील निसर्ग सौदर्य पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असते.

ABP Majha