सलग चौथ्या दिवशी कोकणातला समुद्र खवळलेला आहे. कोकणातील समुद्रकिनारी उंच उंच लाटा पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला धोका नाही चक्रीवादळ आणि खवळलेला समुद्रामुळे नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा दिला असून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान, गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरही बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव दिसला. लाटांच्या तडाख्यामुळे किनारपट्टीवरील छोट्या दुकानदारांचं नुकसान झालं. तर पंधरा पर्यटक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान राज्यात अखेर मान्सूनचे आगमन झालेलं आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वातावरणात झालेल्या बदलामुळे मान्सून आणखी काही काळ लांबण्याची शक्यता होती. पण चक्रीवादळ दिशा बदलली आणि त्याचा परिणाम मान्सूनच्या गतीवर झाला.