खेड जिल्ह्यातील रघुवीर घाटाचे सौंदर्य पावसामुळे अधिकच खुलले आहे.



रत्नागिरी-साताऱ्याला जोडणारा आणि खेड तालुक्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असणारा रघुवीर घाट.



रघुवीर घाट हा पावसाळ्यातील मोठं पर्यटन स्थळ आहे.



या घाटामध्ये अनेक पर्यटक वर्षा पर्यटनासाठी याच महिन्यापासून हजेरी लावतात.



एका बाजूला खोपी गाव, खोपीचे धरण आणि याच धरणाच्या वरच्या बाजूला उंचीवर घाट मार्ग



या घाटात पावसात प्रवाहित होणारे धबधबे, थंड वातावरण आणि धुक्याची दाट चादर ही वैशिष्ट्ये पर्यटकांना भुरळ घालते.



मात्र या घाटाचा रस्ता हा गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे खचला आहे.



वाहनांना अपघात होऊन जीवितहानी होण्याच्या शक्यतेने सध्या घाट बंद ठेवण्यात आला आहे.



घाट बंद असला तरी आम्ही तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून रघुवीर घाटाची खास दृश्ये दाखवत आहोत.



Thanks for Reading. UP NEXT

बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री प्रियंका!

View next story