कोकणात आजपासून नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात होत आहे.



पावसाने गेले काही दिवस दडी मारली असल्याने मासेमारी हंगामाची दमदार सुरुवात होईल.



पावसाळ्यात समुद्राला असलेलं उधाण, माशांच्या प्रजननाचा काळ यामुळे जून आणि जुलैमध्ये मासेमारी बंद असते.



राज्यात 15 लाखाहून अधिक कुटुंब मासेमारीवर अवलंबून आहेत.



महाराष्ट्रातून वर्षाकाठी चार ते पाच लाख हजार मॅट्रिक टन इतकी मासेमारी होत असते.



श्रावण मास सुरु झाल्याने माशांच्या दरांवर काही प्रमाणात परिणाम झालेला दिसून येतो.



पण श्रावण संपल्यानंतर मात्र माशांचे दर आणखी वाढू शकतात.



मासेमारीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल देखील होत असते.



आजपासून मासेमारी सुरु होत असली तरी नारळीपौर्णिमेनंतर मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरु होईल.