हवाई संरक्षण यंत्रणा भारतीय लष्कराचा एक भाग आहे. भारताच्या हवाई सुरक्षेत आणखी वाढ झाली आहे. भारताने आज ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावर मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. डीआरडीओच्या अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की ही हवाई संरक्षण यंत्रणा भारतीय लष्कराचा महत्त्वाचा भाग आहे. हे क्षेपणास्त्राने लांब अंतरावरून लक्ष्यावर थेट हल्ला करु शकते. भारताने याआधी 23 मार्च ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करण्याची यशस्वी चाचणी घेतली. ही चाचणी अंदमान आणि निकोबार बेटांवर करण्यात आली.