भारतीनं आणखी एक यशस्वी भरारी घेतली आहे.

भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ 'अग्नि प्राइम' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे.

या क्षेपणास्त्राला अग्नि-पी असंही म्हटलं जातं.

DRDO कडून 'अग्नि प्राइम' या न्यू जनरेशन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची

यशस्वी चाचणी करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे

या क्षेपणास्त्रामध्ये एकाच हल्ल्यात शत्रूचे अनेक अड्डे उद्धवस्त करण्याची क्षमता आहे.

ओडिशाच्या किनार्‍यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून 'अग्नि प्राइम' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली

अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने निवेदनात ही माहिती दिली आहे.

प्रणालीची अचूकता आणि विश्वासार्हता तपासण्यासाठी अग्नि प्राइम क्षेपणास्त्राच्या

तीन यशस्वी विकासात्मक चाचण्यांनंतर वापरकर्त्यांनी प्री-इंडक्शन नाईट लाँच केलं