अभिनेत्री श्रिया सरन सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. श्रियाची साडी स्टाइल अप्रतिम असते. श्रिया सरन प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते. श्रियाने नुकतेच तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तिने गोल्डण रंगाची साडी परिधना केली आहे. साडीसोबत श्रियाने कपाळावर एक सुंदर असा तिलक लावलेला दिसत आहे. श्रिया सरनचा हा लूक चाहत्यांची मनं जिंकत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवणाऱ्या श्रिया सरनचे सर्वांनाच वेड लागले आहे. श्रिया सरनचे हे फोटो तिचे चाहते सोशल मीडियावर खूप शेअर करत आहेत. श्रिया सरनच्या या ड्रेसचे चाहते कौतुक करत आहेत.