बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्री लवकरच साउथमध्ये डेब्यू करणार आहेत. अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री दिशा पटानी लवकरच साउथमध्ये डेब्यू करणार आहे. दिशा पटानी सूर्या 42 या सिनेमातून साउथ मध्ये डेब्यू करणार आहे. सूर्या 42 हा सिनेमा दहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अनेक बॉलीवूड अभिनेत्रींप्रमाणेच दिशा देखील बॉलीवूडमधून साउथमध्ये आपले भविष्य अजमावणार आहे. दिशा पटानी सूर्या 42 या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता सूर्यासोबत दिसणार आहे. एवढ्या मोठ्या चित्रपटाचा भाग झाल्यामुळे दिशा पटानी खूप आनंदी आहे दिशाने बॉलीवूडच्या अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.